कुणेगाव कातकरी वस्ती येथे 15 हजार किंमतीचा दारुसाठी जप्त

लोणावळा : कुणेगाव कातकरी वस्ती येथे झाडाच्या आडोश्याला अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या एका ठिकाणावर लोणावळा शहर पोलिसांनी आज अचानक छापा मारत 14 हजार 825 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आल्याची चाहूल लागताच सदर दारू विकणारी महिला झाडा झुडपांचा फायदा घेत पळून गेली. याप्रकरणी सहायक फौजदार सूर्यकांत वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पिंकी अर्जुन हीलम (रा. कातकरी वस्ती, कुणेगाव) यांच्यावर म.प्रो.अँक्ट क.65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डूबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयूर अबनावे तपास करत आहेत.