Maval News l पाऊण कोटीच्या मुद्देमालासह जुगार खेळणारे 10 जण पोलिसांच्या ताब्यात; एमडी पावडर देखील जप्त
लोणावळा : अवैद्य व्यवसायांच्या विरोधात लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची जोरदार कारवाई मोहीम मावळ तालुक्यात सुरू आहे. सोमवारी 12 ऑगस्ट रोजी वेहेरगाव येथे एका घरात सुरू असलेल्या अवैद्य जुगार अड्ड्यावर त्यांच्या पथकाने रात्री उशिरा धाड टाकत तब्बल पाऊण कोटीच्या मुद्देमाला सह जुगार खेळणारे 10 जण ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी एकाकडे एमडी नावाची पावडर देखील मिळून आली आहे.
सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. त्यावरून श्री कार्तीक यांनी सोमवारी रात्री पथकासह सापळा लावत वेहेरगाव येथील श्री मडवी यांचे बंगल्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये 10 जण जुगार खेळताना मिळून आले आहेत. सदर ठिकाणी तीन पत्ती जुगार खेळणारे सर्वजण हे मावळ तालुक्यातील स्थानिक आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, वाहने व इतर साधने असा 74 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून दहा जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 5. एन.डी.पी.एस. 1985 चे कलम 8 (क) 21 (ब)
अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस निरीक्षक शेवते, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो. हवा अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो. कॉ गणेश येळवंडे, पो. कॉ मंगेश मारकड यांच्या पथकाने केली.