Breaking news

Maval Loksabha Election | मावळ लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार मुकेश अगरवाल यांचा डिजिटल माध्यमातून जोरदार प्रचार

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून 2024 च्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले मुकेश मनोहर अगरवाल यांचा डिजिटल माध्यमातून जोरदार प्रचार मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. सोशल मीडिया व डिजिटल मीडिया यांचा प्रभावी वापर करत मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मुकेश अगरवाल हे करत आहे. कपाट हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून आपले निवडणुकीचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. 

     मुकेश अगरवाल म्हणाले महाराष्ट्रातील मागील काही काळातील राजकारण पाहता मतदार हा सर्वच राजकीय पक्षांना व त्यांच्या भूमिकांना कंटाळला आहे. मतदारांना एक सक्षम असा पर्याय हवा असून माझ्या माध्यमातून तो पर्याय मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये देण्याचा प्रयत्न मी व माझ्या मित्र परिवाराकडून करण्यात आला आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदारांनी ज्यांना विश्वासाने मते दिली पुढील काही दिवसात त्यांनी विरोधकांसोबत हात मिळवणी करत घरोबा साधला. त्यामुळे मतदारांनी दिलेली मते ही वाया गेली आहे. यावेळी मात्र असा प्रकार घडू नये याकरिता मतदारांनी विचारपूर्वक राजकीय पक्षांना पर्याय म्हणून उपलब्ध असलेल्या अपक्ष व समाजासाठी सातत्याने काम करत असलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पर्याय निवडावा. मतदार संघातील प्रत्येक मतदारासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवत मावळ लोकसभा मतदारसंघात विकास करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.

इतर बातम्या