Breaking news

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा 2 मे रोजी दहिवली येथे होणार

लोणावळा : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा येत्या 2 मे रोजी संस्कारशाळा आश्रम दहिवली - कार्ला या ठिकाणी सायंकाळी 05.05 मिनिटांनी होणार आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पाच लग्न होणार आहे. सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. 

      सामुदायिक विवाह सोहळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर दुपारी बारा वाजता हळदी समारंभ, त त्यानंतर भोजन व सायंकाळी 05.05 वाजता वाजता विवाह सोहळा संपन्न होणार आहे. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज नव वधूवरांना शुभ आशीर्वाद देणार आहेत.

    या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या नववधूला सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले, नथनी पैंजण जोडवी व मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे. तसेच साखरपुड्याची साडी व लग्नाचा शालू, संसार उपयोगी वस्तू देखील आयोजकांकडून देण्यात येणार आहे. वर राजाला साखरपुड्याचा व लग्नाचा पोशाख, मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे. सोबतच बँड पथक वाजंत्री रथ याची सुविधा देखील आयोजकांकडून करण्यात आली आहे विवाह सोहळा हा नियोजित मुहूर्तावरच लागणार असल्याने परिसरातील नागरिकांनी या लग्न सोहळ्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

    अमोल भेगडे हे यावर्षी सोहळा समितीचे अध्यक्ष असून डॉक्टर मनोज येवले हे कार्याध्यक्ष आहेत. माजी उपसभापती शरद हुलावळे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, उद्योजक चंद्रकांत शेलार, संतोष केदारी, संदीप तिकोने हे या सोहळा समितीचे संस्थापक आहेत. यासह कार्ला पंचक्रोशीमधील अनेक मान्यवर सोहळा समितीचे सदस्य असून या सर्वांनी सदरचा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे.

इतर बातम्या