Breaking news

Lonavala Rain | लोणावळ्यात दुपार पासूनच पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

लोणावळा : सकाळपासून उकडा वाढल्याने आज दुपारी साडेबारा वाजताच लोणावळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. काल बुधवारी रात्री देखील साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लोणावळा परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला होता.

      मागील दोन-तीन दिवसांपासून लोणावळा परिसरामध्ये अवकाळी पावसाची एन्ट्री होत असल्याने नागरिकांची तारांबळ उडू लागली आहे. सध्या मे महिन्यात सर्वत्र लगीन घाई सुरू आहे. या लग्न सोहळ्यांमध्ये अवकाळी पावसाचे विघ्न येऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आज देखील लोणावळा व मावळ परिसरामध्ये अनेक ठिकाणी लग्न सोहळे होणार आहेत मात्र पावसाने दुपारी हजेरी लावल्याने वऱ्हाडी मंडळींची धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास तसेच रात्री पावसाने चांगलाच तडाका दिल्याने जागोजागी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामीण भागामध्ये कार्ला वीज वितरण कार्यालयाच्या अंतर्गत आज गुरुवारी दिवसभर वीस पुरवठा बंद ठेवत लाईटच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू होते. शहरात देखील ज्या ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांना अडचणीच्या ठरत आहेत, त्या तोडण्यासाठी लोणावळा वीज वितरण कार्यालयाकडून उपाय योजना जलद गतीने करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.

इतर बातम्या