Breaking news

वलवण समतानगर परिसरात महायुतीचे श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार; महिलांचा लक्षणीय सहभाग

लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे, एसआरपी या घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा बुधवारी वलवण, समतानगर या विभागात संपन्न झाला. 

      वलवण प्रभाग व समतानगर परिसर आदी ठिकाणी घरोघरी लोणावळा शहरातील महायुतीचे पदाधिकारी यांनी कार्यअहवाल व पत्रकाचे वाटप केले. यावेळी प्रभाग प्रचारात महायुतीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

नाभिक समाजाचा मेळावा

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भांगरवाडी येथील सुमित्रा सभागृहामध्ये बुधवारी रात्री नाभिक समाजाचा मेळावा पार पडला नाभिक समाजाने या निवडणुकीमध्ये बारणे यांना पाठिंबा दिला आहे विविध मान्यवरांनी व समाजातील ज्येष्ठांनी या मेळाव्यात उपस्थित यांना मार्गदर्शन केले.

इतर बातम्या