Breaking news

वादळी वाऱ्यामुळे शिलाटणे गावात काही घरांचे पत्रे उडाले तर कार्ला गावात गाडीवर झाडाची फांदी पडली

कार्ला (प्रतिनिधी) : आज दुपारच्या सुमारास आकाशामध्ये अचानक काळया ढगांची दाटी होऊन जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाल्याने शिलाटणे गावामध्ये काही घरांचे व दुकानांचे पत्रे उडाले आहेत तर कारला गावात वीज वितरण कार्यालयाच्या समोर झाडाची फांदी तुटून एका चार साठी गाडीवर पडल्याने गाडीच्या नुकसान झाले आहे. मागील चार-पाच दिवसांपासून मावळ तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस कमी अधिक प्रमाणात होत आहे पावसासोबत मोठ्या प्रमाणात वारा देखील असल्याने झाडे पडणे, पत्रे उडणे असे प्रकार घडत आहेत.

      शिलाटणे गावात पडाळीवर बाबाजी धोंडिबा भानुसघरे, निवृती कोंडिराम भानुसघरे, शांताराम कोंडिराम भानुसघरे या ग्रामस्थांच्या घरांचे व दुकानाचे पत्रे फुटले व उडून गेल्याने नुकसान झाले आहे. कार्ला गावातील वीज वितरण कार्यालयाच्या समोर अक्षय पवार यांच्या चारचाकी गाडीवर झाडाची फांदी पडल्याने गाडीचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे गावातील अनेक झाडांच्या फांद्या देखील तुटल्या आहेत. तसेच या वादळामुळे विजवाहक तारा तुटल्या व खांबाचे देखील नुकसान झाल्याने काही काळ कार्ला भागात विज पुरवठा देखील खंडित झाला होता. परंतु महावितरण कर्मचाऱ्यांनी तो विजपूरवठा तात्काळ सुरळीत केला आहे.

इतर बातम्या