Breaking news

Lonavala News | माजी उपनगराध्यक्ष सिंधुताई कवीश्वर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त काव्य अभिवाचन उपक्रम

लोणावळा : लोणावळा नगरीच्या माजी उपनगराध्यक्ष सिंधुताई धनंजय कवीश्वर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लोणावळा येथील महिला मंडळ हॉलमध्ये काव्य अभिवाचन करण्यात आले. यामध्ये लोणावळा व तळेगाव येथील जवळपास 23 जणांनी काव्य अभिवाचन केले. साहित्य उत्कर्ष मंडळ तळेगाव व निखिल कवीश्वर यांच्या वतीने या काव्य अभिवाचन उपक्रमाचे आयोजन लोणावळा शहरात करण्यात आले होते. 

     सिंधुताई कवीश्वर ह्या लोणावळा नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर यांच्या मातोश्री आहेत आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा व मावळ भागातील कवियत्रींसाठी एक उपक्रम राबवावा अशी संकल्पना मनात आल्याने त्यांनी या काव्य अभिवाचन उपक्रमाचे आयोजन लोणावळा शहरात केले होते यामध्ये कवींनी सामाजिक राजकीय निसर्ग आई-वडील अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या उत्तम प्रकारे त्याचे सादरीकरण केले लोणावळा शहरामध्ये हा एक आगळावेगळा उपक्रम पार पडल्याने त्याला रसिकांनी देखील उत्स्फूर्तपणे दाद दिली. 

    मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रा. जयंत जोर्वेकर, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण मुळे, सहसचिव भास्कर पुंडले, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, वसंत व्याख्यानमाला समिती अध्यक्ष चित्रा जोशी, निवृत्त पोलीस निरीक्षक मोहन जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे, माजी अध्यक्ष विशाल विकारी, संजय पाटील, श्रीराम कुमठेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसेना जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचाचे धनंजय काळोखे, गणेश थिटे आदींनी या काव्य अभिवाचन कार्यक्रमाला भेट देऊन सिंधुताई कवीश्वर यांना शुभेच्छा दिल्या.

     मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाच्या वतीने येत्या काळामध्ये लोणावळा शहरांमध्ये विविध उपक्रम राबवण्याचा मानस यावेळी प्राध्यापक जयंत जोर्वेकर यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रशांत पुराणिक यांनी केले तर निखिल कवीश्वर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

इतर बातम्या