Breaking news

Maval Loksabha Election | पवनानगर व कामशेत भागात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा जोरदार प्रचार

कामशेत (प्रतिनिधी) : कामशेत बाजारपेठ व पवनानगर भागातील तुंग ठोंबरेवाडी, पाठारेवाडी मोरवे, चावसर, धनगरवाडी, शिंदेवाडी, शिळिंब, जाधववाडी, आजीवली, जव्रन नं 1, जवान 2 व 3, तिकोनापेठ, कोथुर्णे, मळवंडी ठुले, चिंचवाडी येथे घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे प्रचारपत्रक व त्यांचे निवडणूक चिन्ह असलेली मशाल घरोघरी पोहचवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक अमित कुंभार, समन्वयक अनिल भालेराव, विभागप्रमुख उमेश दहिभाते, शाखाप्रमुख प्रवीण कालेकर, किशोर शिर्के, सनी मोहिते, शंकर दळवी, शैलेंद्र पासलकर, तानाजी लायगुडे यांच्यासह शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत.

    कामशेत बाजारपेठेतील वॉर्ड क्रमांक तीन भागात उपाध्यक्ष संतोष राक्षे, अमृत शिनगारे, शहर अध्यक्ष संतोष वीर, युवक अध्यक्ष सुरज पुरी, अमोल काळे, आदिल मुजावर, ओबीसी सेलचे अध्यक्ष अभिजित शिनगारे, अल्पसंख्यांक सेलचे मोईन खान, आणि कार्यकर्ते तसेच शिवसेना पक्ष प्रमुख सतीश इंगवले, गणेश भोकरे, सुदेश लाड, माजी उपसरपंच वैशालीताई इंगवले, शिवसेना महिला आघाडी उषाताई इंगवले, माजी उपसरपंच अश्विनीताई भोकरे, वर्षा नवले, पिंकी कदम, लक्ष्मीबाई मोरमारे, सुरेखा डांबरे, ज्योती गाडे, माजी सरपंच तानाजी वाघवले, भारतीय कामगार सेना नेते ज्ञानेश्वर कदम, शिवसैनिक राजूभाऊ चितोडिया, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष शेठ रायसोनी, दिलीप शेठ ओसवाल,  प्रकाश चित्तोडिया, काँग्रेस पक्षाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विमल पडवकर, संजय पडवकर, रोहिदास वाळुंज यांच्यासह आजी माजी शहर प्रमुख उपस्थित होते. यावेळी बाजारपेठेत व मतदारांच्या घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे प्रचार पत्रक व निवडणूक चिन्ह असलेली मशाल याबाबत माहिती दिली.

इतर बातम्या