Breaking news

मतदानासाठी जाताना मतदाराला यापैकी कोणताही पुरावा मतदान केंद्रावर दाखवता येऊ शकतो

लोणावळा : येत्या 13 मे रोजी मावळ लोकसभा या जागेसाठी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी जाताना मतदाराला मतदान ओळखपत्रासह इतर बारा प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येऊ शकते. भारतीय निवडणूक आयोगाने छायाचित्र असलेल्या मतदान ओळखपत्रासह इतर बारा प्रकारचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली आहे. 

कोणते पुरावे ग्राह्य धरले जाणार 

पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचे लायसन्स, बँक किंवा पोस्ट कार्यालयाकडून छायाचित्रासह वितरीत करण्यात आलेले पासबुक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत देण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले ओळखपत्र, निवृत्ती वेतनाचा दस्तऐवज. संसद, विधानसभा, विधान परिषद सदस्यांना वितरित करण्यात आलेले ओळखपत्र, केंद्र अथवा राज्य शासन सार्वजनिक भागीदारीतील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह वितरित केलेले ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सहशक्तीकरण मंत्रालय यांच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाच्या वतीने वितरित करण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड.

इतर बातम्या