Breaking news

श्रीरंग बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे ह्या देखील उतरल्या प्रचाराच्या रिंगणात

लोणावळा : मावळ लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सरिता बारणे ह्या देखील प्रचारात उतरल्या आहेत. आज त्यांनी लोणावळा शहरातील महायुतीचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेतल्या. 

     मावळ लोकसभेची निवडणूक येथे 13 मे रोजी होणार आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना आता खासदार श्रीरंग बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे ह्यादेखील प्रचारात सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे लोणावळा शहरांमध्ये आज त्यांनी विविध महिला पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेत प्रचाराची माहिती घेतली तसेच नागरिकांना श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन देखील केले.

इतर बातम्या