Breaking news

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सह्याद्री नगर हुडको परिसरात कार्य अहवालाचे वाटप

लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( A), रासप, मनसे, एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा मंगळवारी (7 मे) सहयाद्री नगर, हुडको परिसरात राबवण्यात आला.

    सह्यद्रीनगर (हुडको कॉलनी), पुरंदरे शाळा परिसर आदी ठिकाणी घरोघरी जाऊन लोणावळा शहरातील महायुतीचे पदाधिकारी यांनी कार्यअहवाल व पत्रकाचे वाटप केले. यावेळी प्रभाग प्रचारात महायुतीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. बारणे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती यावेळी मतदारांना देण्यात आली.

इतर बातम्या