Breaking news

लोणावळ्यातील पंडित नेहरू शाळेचा परिसर बनलाय दारुड्यांचा अड्डा; कारवाई करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या इंद्रायणी पुला समोरील पंडित जवाहरलाल नेहरू या शाळेचा (हायस्कूल) परिसर दारुड्यांचा अड्डा बनला असून या ठिकाणी रात्रीच्या वेळेस तळीरामांच्या पार्ट्या सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विद्यार्थी आघाडीने केला आहे. याबाबत त्यांनी लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी व लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

     राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अभय रवींद्र परदेशी यांनी निवेदनात म्हटले आहे की शाळेच्या आवारामध्ये तळीराम रात्रीच्या वेळेस मद्यपान तसेच अंमली पदार्थ यांचे सेवन करण्यासाठी बसतात. सदरची शाळा ही लोणावळा बाजारपेठ ते भांगरवाडी या मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने रात्री अपरात्री या भागातून पायी जाणाऱ्या महिला यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच शाळेच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या व इतर कचरा जमा झाला आहे. तरी या निवेदनाची दखल घेत लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस यांनी मद्यपींवर कारवाई करावी तसेच शाळेच्या इमारती साठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.

इतर बातम्या