Breaking news

Maval Loksabha Election | महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे यांचा भांगरवाडी प्रभागात प्रचार; नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

लोणावळा : मावळ लोकसभेचे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शेकाप या महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने भांगरवाडी प्रभाग क्रमांक 05 मध्ये सोमवारी सायंकाळी प्रचार रॅली चे आयोजन केले होते. या रॅली दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या निवडणुकीत मशाल प्रज्वलित करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, काँग्रेस पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर प्रमुख नासीर शेख यांनी दिली.

      भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवत भांगरवाडी प्रभागात प्रचार करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीकडून नागरीकांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेऊन परीचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. त्यांना दहा वर्ष मागील खासदारांनी कशी लोणावळाकर जनतेची दिशाभूल केली हे सांगण्यात आले. त्यांनी कोणतेही ठोस काम दहा वर्षात लोणावळा शहरासाठी केले नाही, रेल्वेच्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाचे काम देखील त्यांना आतापर्यंत पूर्ण करता आले नाही. ते काम देखील मागील काही वर्षांपासून अर्धवट पडले असल्याने नागरिकांना रेल्वे गेटचा त्रास सहन करावा लागतो आहे. लोणावळ्यातील वाहतूकीची समस्या, रस्ता रुंदीकरण ही कामे करता आली नाही. यावेळी लोकांनी देखील अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला.

       यावेळी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला व युवक पदाधिकारी, माजी नगरसेवक व विविध आघाड्यांचे प्रमुख, सेवादलाचे पदाधिकारी व तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या