Breaking news

लोणावळ्यात शनिवारी महायुती कडून नांगरगाव मध्ये श्रीरंग बारणे यांचा प्रचार

लोणावळा : मावळ लोकसभेसाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. याकरिता महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. लोणावळा शहरांमध्ये अगदी नगरपालिका स्तरावर प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

         महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून भाजपा, शिवसेना शिंदे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून प्रभाग निहाय प्रचार सुरू आहे. घरोघरी जाऊन नागरिकांना श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात काय विकास कामे केली याचा कार्य अहवाल दिला जात आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून हा प्रचार सुरू असून येथे दहा मे पर्यंत प्रभाग निहाय प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. 

      लोणावळा शहरामध्ये महायुतीकडून जोरदार प्रचार राबवण्यात येत असून आपला उमेदवार कसा योग्य व सक्षम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहे. पुढील आठवड्यामध्ये लोणावळा शहरात महायुतीकडून रोड शो करण्यात येणार असून त्याकरिता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. अगदी नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली जाते अशाच प्रकारे प्रचार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रीय स्तरावरून स्थानिक पातळीवर आली आहे प्रचारात देखील आपल्या शहरांमध्ये काय विकास कामे झाली किंवा काय करण्याची आश्वासन उमेदवार देत आहेत हे मतदारांना सांगितले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

इतर बातम्या