Breaking news

लोणावळ्यात 71 वर्षापूर्वी काढलेल्या त्या दुर्मिळ फोटोमुळे जुन्या आठवणींना मिळाला उजाळा; फोटो कैवल्यधाम येथील संग्रालयाला सुपूर्द


लोणावळा : 71 वर्षापूर्वी लोणावळा शहरांमध्ये गुजराती शाळेचे उद्घाटन 16 मे 1953 रोजी करण्यात आले होते. त्या उद्घाटन सोहळ्यासाठी कैवल्यधाम योग संस्थेचे संस्थापक स्वामी कुवल्यानंद व लोणावळा शहरांमधील त्या काळातील प्रतिष्ठित व्यापारी व जुने जाणते कारभारी उपस्थित होते. असा हा दुर्मिळ फोटो लोणावळ्यातील नितीन भाई शहा यांच्याकडून उपलब्ध झाला आहे. सदरचा फोटो हा शाळेच्या 71 व्या वर्षपूर्ती निमित्त व कैवल्यधाम योग संस्थेच्या शतक महोत्सवाच्या निमित्त कैवल्यधाम संस्थेला भेट देण्याची संकल्पना लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र कल्याण ची टेलर यांनी व्यक्त केली. त्यानुसार काल 16 मे च्या पूर्वसंध्येला कैवल्यधाम योग संस्थेचे अध्यक्ष ओ.पी. तिवारी, संस्थेचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

      यावेळी लोणावळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धीरूभाई कल्याणजी टेलर, प्रकाश रमणीकलाल पारेख, लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र कल्याणजी टेलर व ध्रुवी कल्याणजी टेलर हे उपस्थित होते. अतिशय दुर्मिळ असा हा फोटो असून 71 वर्षांपूर्वी लोणावळा शहराच्या विकासाला ज्यांनी हातभार लावला असे जुने जाणते व प्रतिष्ठित मंडळी व ज्यांनी जागतिक कीर्तीचे योग संस्था उभी केली असे स्वामी कुवल्यानंद या फोटोमध्ये आहेत. कैवल्यधाम च्या फोटो गॅलरीमध्ये हा फोटो चिरकाल राहील असा आशावाद देखील यावेळी जितेंद्र टेलर यांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या