Breaking news

Maval News | अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने पॉली हाऊसचे होत्याचे नव्हते झाले; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यामध्ये गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अंदर मावळ येथील बेलज या गावातील शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊस चे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे पॉलिहाऊस चे शेड उडून गेल्याने व त्याचे होत्याचे नव्हते झाले असून शेतकरी उत्पादक सुभाष ओव्हाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

     ओव्हाळ यांनी मागील वर्षी स्वनिधीतून या पॉलिहाऊसची उभारणी केली होती. याकरिता कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नव्हते. मात्र वर्षभरातच नैसर्गिक आपत्तीमुळे पॉलिहाऊस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी सुभाष ओव्हाळ हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने तात्काळ या नुकसानीचा पंचनामा करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.    

       लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये गुरुवारी दुपारी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व वादळी वारा झाला. यामध्ये वडगाव भागातील एक होर्डिंग देखील पडले असून विजेचे अनेक खांब पडल्याने वडगाव परिसरातील वीजपुरवठा मागील 20 तासांपासून खंडित झाला आहे. होर्डिंग पडल्याने त्या भागात नुकसान देखील झाले आहे. तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडणे, शेड उडणे, झाडे तुटून पडणे आदी आपत्तीक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा शासनाने महसूल विभागाकडून पंचनामा करत नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी सर्व भागातून होत आहे.



इतर बातम्या