Breaking news

लोणावळा नगरपरिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सूर्यकांत हळूंदे यांची बिनविरोध निवड; उपाध्यक्षपदी बबन कांबळे बिनविरोध

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सूर्यकांत बाबुराव हळूंदे यांची तर उपाध्यक्षपदी बबन तुकाराम कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालय या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी के. एस. निखारे व सहाय्यक निवडणूक अधिकारी डी. एम. गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. संस्थेचे माजी अध्यक्ष चेतन सारवण व उपाध्यक्ष श्रीमती स्वाती गायकवाड यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी अनुक्रमे एक एक अर्ज प्राप्त झाल्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध पार पडली.

मावळ तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मावळ श्री नवनाथ अनपट यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अनिल अकोलकर, खजिनदार जितेंद्र राऊत, संचालक संतोष गिरी, मुरलीधर कांबळे, श्रीमती जयश्री रानवे, श्रीमती स्वाती गायकवाड आदी उपस्थित होते.

इतर बातम्या