Breaking news

कार्ल्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व किल्ले स्पर्धेचा जल्लोष !

लोणावळा : ॲड. कु. विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या विशेष पुढाकारातून, श्री शिवशंकर तरुण मंडळ आणि कार्ला ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्ला येथे इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तसेच 'कार्ला गाव मर्यादित किल्ले स्पर्धा' उत्साहात पार पडली. किल्ले स्पर्धेचे यंदाचे १० वे वर्ष होते. प्रेम, उत्साह आणि परंपरेने भारलेल्या या शानदार कार्यक्रमात मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या हस्ते गुणवंतांचा व यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.

गुणवंतांचा व किल्ले स्पर्धक संघांचा गौरव

या कार्यक्रमादरम्यान कार्ला गावातून इयत्ता १० वी, १२ वी तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट प्राविण्य मिळवलेल्या सुमारे शंभर गुणीजनांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच, किल्ले स्पर्धेत सहभागी झालेल्या वीस संघांमधून उल्लेखनीय किल्ले साकारणाऱ्या विजेत्या संघांना खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली:

प्रथम क्रमांक : नवजीवन संघ बालमित्र मंडळ, द्वितीय क्रमांक : हनुमान बालमित्र मंडळ, तृतीय क्रमांक : आई एकविरा बालमित्र मंडळ व शंभू प्रसाद हुलावळे बालमित्र

कार्यक्रमादरम्यान लहान मुलांनी आणि उपस्थितांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले. विशेषतः चिमुरडा निल पटेकर याने सादर केलेल्या ओघवत्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकून संपूर्ण वातावरण भारावून टाकले. या दिमाखदार सोहळ्यास मावळचे माजी उपसभापती शरद हुलावळे, माजी सरपंच प्रदीप हुलावळे, माजी सरपंच सागर हुलावळे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संतोष गिरी, संस्कार आश्रमचे बालाजी महाराज, युवा सेना उपतालुका प्रमुख नितीन देशमुख, युवा नेते समीर हुलावळे, महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिनेश जाधव, तसेच ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ सावंत, नारायण हुलावळे, जालिंदर वायकर, आबू हजारे, शंकर दळवी, मारूती डिमळे, भाऊसाहेब हुलावळे, गणेश मोरे, विजय जाधव, संतोष केदारी, सहादू बडेकर, अविनाश मोरे, संजय हुलावळे, आनंता मोरे, राजाराम पडवळ, आनंता हुलावळे, योगेश जाधव, सचिन भीम हुलावळे, रूपेश सावंत, प्रविण दत्तात्रय हुलावळे, सचिन ना. हुलावळे, प्रविण जंगम, वैभव चव्हाण आणि श्री शिवशंकर मंडळाचे अध्यक्ष गणेश हुलावळे, रोहिदास शिर्के, प्रविण हुलावळे, अक्षय हुलावळे, किरण गायकवाड, आदेश हुलावळे, अक्षय केदारी, अमोल इंगवले, सचिन वाडेकर, सोमनाथ वाडेकर, अंकुश हुलावळे, आकाश शिरीष हुलावळे, आशु इंगवले, ओंकार हुलावळे, माऊली हुलावळे, निलेश सागर, यांच्यासह कार्ला गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. विशाल भाऊसाहेब हुलावळे यांनी केले, सूत्रसंचालन दिनेश जाधव यांनी पार पाडले, तर आभार भाऊसाहेब हुलावळे यांनी मानले.

इतर बातम्या