Breaking news

Accident Breaking News : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कुणेगाव पुलावर केमिकलच्या टँकरला भिषण आग; मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एका केमिकल टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो रस्ता दुभाजकाला धडकला. यामध्ये केमिकलने पेट घेतल्याने संपूर्ण टॅकर जळून खाक झाला आहे. तर पेटत्या टॅकरमधून केमीकल व आगीचे लोट पुलाच्या खाली पडले व पेट घेतला. या घटनेत एकूण चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभिर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत पुलाच्या खाली व पुलाच्या वर दोन्हीकडे आगीचे मोठमोठे लोट उसळले होते. आगीची माहिती समजताच लोणावळा शहर पोलीस, खंडाळा महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संघटनांचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाची पथके देखील घटनास्थळी दाखल झाली व आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले. त्यातच पाऊस देखील आल्याने आग विझविण्यास मदत झाली. अतिशय भयंकर अशी ही घटना असून संपुर्ण परिसरास आगीचे लोट पहायला मिळत होते. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेस वे बंद करण्यात आला होता. दुपारी दिडनंतर आग नियंत्रणात आल्यानंतर पुण्याचे दिशेने जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती. अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालक व प्रवाशी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जखमीवर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोणावळा विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व महामार्गच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहिती घेतली. नागरिक देखील मोठ्या संख्येने जमले होते. मयत व्यक्तीपैकी दोन जण कुणेगाव येथील स्थानिक असून उर्वरित दोन जण टॅकरमधील आहेत.

या अपघातात पुलाच्या खालून दुचाकीवरून जाणार्‍यांपैकी कुशल कैलास वरे (वय 9) व रितेश महादू कोशिरे (वय 17), सविता कैलास वरे (वय 33) व टॅकर मधील एक अनोळखी इसम असे चार मयत झाले असून टॅकर मधील दोन जण व एक कार चालक असे तीन जण जखमी आहेत. त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

इतर बातम्या