Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala Good News l सिनियर स्टेट ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रांजल विनोद बच्चे हिला सुवर्ण पदक

लोणावळा : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या सिनियर स्टेट ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप (Senior State Athlytic Championship) 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत लोनावळा महाविद्यालयाची (Lonavala College) S.Y.B.COM ची विद्यार्थींनी कु.प्रांजल विनो�

Lonavala News l वन्यजीव रक्षक मावळ संस्थे कडून 8 फुटी अजगराला जीवदान

लोणावळा : (Lonavala) लोणावळ्याजवळ असलेल्या औंढोली या गावात आढळलेल्या 8 फुटी अजगराला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा सदस्यांनी पकडून लगेच सुरक्षितपणे जंगलात सोडले आहे. रविवारी रात्री हे रेस्कू करण्य�

क्राईम न्युज

तळेगाव दाभाडे हिट अँड रन प्रकरण l तळेगाव CO ना पोलिसांनी घेतले ताब्यात, दोन गाड्यांना धडक देऊन केले होते पलायन

तळेगाव दाभाडे : Talegoan Dhabhade Car Accident पुण्यातील हिट अँड रन चे प्रकरण ताजे असताना आता मावळ तालुक्यातील तळेगाव स्टेशन या भागात देखील शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हिट अँड रन चा प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये खुद्द तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी (CO) यांच्या स्कॉर्पिओ गाडीने भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने या वाहनांमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच कोणी जखमी देखील झालेले नाही. मात्र या घटनेमध्ये स्कॉर्पिओसह उभ्या असलेल्या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर घटनास्थळावर न थांबता तळेगाव सिओ यांची स्कॉर्पिओ गाडी घटनास्थळावरून भरधाव वेगाने निघून गेली. काका हलवाई या दुकानाच्या समोर झालेल्या या अपघातानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना तळेगाव पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. काही प्रत्यक्ष दर्शनी पाटील हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे म्हटले असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.      तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव स्टेशन ते तळेगाव दरम्यान असलेल्या रस्त्यावर काका हलवाई या दुकानासमोर दोन चार चाकी वाहने उभी होती. या वाहनांना भरधाव वेगातील लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक (MH 13 EC 9633) हिने जोरदार धडक दिली. यामध्ये एक पोलो कार (MH 14 CX 3660) व ब्रिझा कार (MH 14 GS 2404) यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलो कारचे मालक सिध्दाराम इराप्पा लोणीकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची फिर्याद दिली आहे. ही धडक दिल्यानंतर मुख्याधिकारी पाटील यांनी घटनास्थळावर न थांबता त्या ठिकाणाहून गाडी वेगात पळवत पळून गेले असे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे. मुख्याधिकारी पदावर बसणारा क्लास वन अधिकारी अशा पद्धतीने वाहने चालवत वाहणाना धडका देत पळून जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाचा आदर्श घ्यावा पुणे येथील प्रकरण देशभर गाजत असताना देखील नशा करून वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे खंत जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अपघाताची घटना समजल्यानंतर तळेगाव पोलिसांनी घटनास्थळावर पाहणे करून प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या वर्णनावरून स्कॉर्पिओ गाडीचा शोध घेतला असता सदरची गाडी मुख्याधिकारी पाटील राहत असलेल्या इमारतीच्या खाली मिळून आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांच्या पथकाने पाटील यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. या घटनेचा अधिकचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

मावळ

दुःखद घटना l कासारसाई धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू

तळेगाव दाभाडे : कासारसाई धरणात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी (29 मे) दुपारी घडली आहे.     मुरली कृष्णा बोला (वय 21, रा. कोरेगाव पार्क, पुणे; मूळ रा. आंध्र प्रदेश) आणि कुणाल सर्वेश दुबे (वय 21, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.   मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका महाविद्याल्यातील चार विद्यार्थी आज दुपारी कासारसाई येथील धरणावर आले होते. पाण्याचा आनंद घेण्यासाठी ते पाण्यात उतरले होते मात्र खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. इतर दोन विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यश न आल्याने काही नागरिकांनी शिरगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली तसेच मावळ वन्यजीव रक्षक टीमला याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर बचाव पथकाने पोलिसांच्या समवेत कासारसाई धरणावर येत शोध मोहीम राबवली. साडेतीन वाजण्याच्या सुमारास बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी शिरगाव पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

पिंपरी चिंचवड

Maval Loksabha Election l मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज - दीपक सिंगला

पुणे : मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत खराडे, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, मनिषा तेलभाते, मनुष्यबळ कक्ष समन्वयक राजू ठाणगे आदी उपस्थित होते.       येत्या 4 जून रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्षात (स्ट्राँग मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी 8 वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचनामावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 24 टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 23 फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल आणि 24 फेऱ्या तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी 16 टेबल लावण्यात येणार असून 25 फेऱ्या होणार आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र 5 टेबल याप्रमाणे एकूण 113 टेबलवर मतमोजणी होईल. मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्तीमतमोजणीसाठी एकूण 1 हजार 530 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सहा मतदार संघांसाठी 6 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 9 अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 58 इतर अधिकारी, 205 सूक्ष्म निरीक्षक, 118 मतमोजणी पर्यवेक्षक, 175 मतमोजणी सहाय्यक, 96 तालिका कर्मचारी यांच्याशिवाय 863 शिपाई, हमाल व इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.  मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाईनिवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारीकायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच प्राधिकृत माध्यम प्रतिनिधींना बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राजवाडा गेटने प्रवेश दिला जाईल. 150 मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी केले.

Video News

अन्य बातम्या

निधनवार्ता l वाकसई चाळ येथील मधुकर विकारी यांचे निधन

Lonavala : वाकसई चाळ येथील हभप मधुकर तुकाराम विकारी यांचे आज रविवारी (02 जून) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.    त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सून, जावई, नातवंडं असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी सोमवारी (3 जून) सकाळी 10 वाजता वाकसई येथील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. मधुकर विकारी हे वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असून उत्कृष्ट मृदुंगमणी म्हणून त्यांची ओळख होती.

Mavalmaza android application

Coming soon..