Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

वलवण समतानगर परिसरात महायुतीचे श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार; महिलांचा लक्षणीय सहभाग

लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे, एसआरपी या घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार सं�

Lonavala News | माजी उपनगराध्यक्ष सिंधुताई कवीश्वर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त काव्य अभिवाचन उपक्रम

लोणावळा : लोणावळा नगरीच्या माजी उपनगराध्यक्ष सिंधुताई धनंजय कवीश्वर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लोणावळा येथील महिला मंडळ हॉलमध्ये काव्य अभिवाचन करण्यात आले. यामध्ये लोणावळा व तळ

क्राईम न्युज

Maval News | वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर कारवाई; सुमारे दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरोधात गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने वडगाव मावळ येथे 1 मे च्या रात्री 1 वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 1 लाख 37 हजार 677 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.     याविषयी बोलताना आयपीएस कार्तिक म्हणाले, वडगाव मावळ येथे मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी (1 मे)  रात्री 1.10 वाजता बातमीच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील केशवनगर भागातील एका खोलीमध्ये दिब्यांशू श्रीमुलचंद धारिया (वय 21 वर्ष, राहणार केशवनगर, वडगाव) यांच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा 1 लाख 37 हजार 677 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. आरोपीचा साथीदार तनविर शेख (राहणार केशवनगर, वडगाव मावळ) हा पोलिसांची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे.        सदरचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 328,272,273,34 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा.अंकुश नायकुडे, पो.हवा. नितेश कवडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.

मावळ

Maval Loksabha Election | मावळ लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार मुकेश अगरवाल यांचा डिजिटल माध्यमातून जोरदार प्रचार

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून 2024 च्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले मुकेश मनोहर अगरवाल यांचा डिजिटल माध्यमातून जोरदार प्रचार मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. सोशल मीडिया व डिजिटल मीडिया यांचा प्रभावी वापर करत मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मुकेश अगरवाल हे करत आहे. कपाट हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून आपले निवडणुकीचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सातत्याने प्रयत्नशील आहेत.      मुकेश अगरवाल म्हणाले महाराष्ट्रातील मागील काही काळातील राजकारण पाहता मतदार हा सर्वच राजकीय पक्षांना व त्यांच्या भूमिकांना कंटाळला आहे. मतदारांना एक सक्षम असा पर्याय हवा असून माझ्या माध्यमातून तो पर्याय मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये देण्याचा प्रयत्न मी व माझ्या मित्र परिवाराकडून करण्यात आला आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदारांनी ज्यांना विश्वासाने मते दिली पुढील काही दिवसात त्यांनी विरोधकांसोबत हात मिळवणी करत घरोबा साधला. त्यामुळे मतदारांनी दिलेली मते ही वाया गेली आहे. यावेळी मात्र असा प्रकार घडू नये याकरिता मतदारांनी विचारपूर्वक राजकीय पक्षांना पर्याय म्हणून उपलब्ध असलेल्या अपक्ष व समाजासाठी सातत्याने काम करत असलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पर्याय निवडावा. मतदार संघातील प्रत्येक मतदारासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवत मावळ लोकसभा मतदारसंघात विकास करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.

पिंपरी चिंचवड

Maval Loksabha Election | देशवासियांसमोर मोदींचा खोटेपणा उघडा पडलाय - ॲड. असीम सरोदे

पिंपरी (प्रतिनिधी) : लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला नरेंद्र मोदी यांचा खोटेपणा समजला आहे. भाजपच्या सरकारने नवीन कायदे करून इलेक्ट्रॉल बॉण्डसारखा सर्वात मोठा राजकीय घोटाळा केला आहे. 2014 मध्ये त्यांच्या खोट्या आश्वासनांना भुलून सुशिक्षित लोकांनी केलेली चूक या लोकसभा निवडणुकीत सुधारावी लागेल. देशासाठी आणि संविधानासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन निर्भय बनो अभियानाचे संयोजक तथा विधीज्ञ ॲड. असिम सरोदे यांनी केले.        मावळ लोकसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या समर्थनार्थ चिंचवडमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख ॲड‌. सचिन भोसले, महिला संघटिका सुलभा उबाळे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, आम आदमी पक्षाचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, पिंपरी चिंचवड डॉक्टर सेलचे डॉ.‌ सुनील जगताप, डॉ. मनोज राका, मनिषा गरुड, डॉ. अर्चना वाघेरे, डॉ. दत्तात्रय कोकाटे, डॉ. अभय तांबिले, डॉ. वैशाली कुलथे, डॉ. अनिकेत अमृतकर, डॉ. सुजित पोखरकर, डॉ. प्रफुल पगारे यांच्यासह शहरातील विविध डॉक्टर संस्था व संघटना यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.       ॲड‌. असीम सरोदे पुढे म्हणाले, मोदींना पराभव दिसू लागलेला आहे. म्हणून ते आता उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करुन त्यांनी राजकारण खराब केले. भाजपमधील चांगल्या विचारांच्या लोकांना देखील ते पुन्हा सत्तेवर नको आहेत. अनेक उमेदवार मोदींची सभा नको म्हणतात. अतिशय चुकीचे राजकारण त्यांनी केलं आहे. महाराष्ट्रात फिरल्यानंतर जनता भाजप आणि नरेंद्र मोदी यांना कंटाळलेली आहे, हे लक्षात येते. तर फडणवीसांना त्यांनी केलेल्या राजकीय पातकासाठी जनता माफ करणार नाही. राज्यात भाजपला लोकसभेच्या खूप कमी जागा मिळत आहेत. या निवडणुकीचे महत्त्व ओळखून सर्वांनी मावळमध्ये महाविकास आघाडीला व संजोग वाघेरे यांना मतदान करून विजयी करा. आजच्या घडीला त्यांच्यासारख्या विनम्र, संवेदनशील व्यक्तींची राजकारणात गरज आहे, असेही असीम सरोदे म्हणाले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा व‌ त्यांच्या हिताचा विचार इंडिया आघाडीने मांडला असून 25 लाखांचा कॅशलेस विमा ही त्यांची घोषणा महत्वाची ठरेल, असेही ते म्हणाले.       उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले, दहा वर्षांत देशाला वेगळ्या मार्गाला घेऊन जाण्याचे काम सुरू आहे. नोक-या कमी झाल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण वाढले. योजनांची अंमलबजावणी होत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. नवीन सुधारणांसाठी आणि तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. कोरोना काळात महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी सांभाळली. हे डॉक्टर अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यांना साथ देण्यासाठी मशाल चिन्ह लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.      या बैठकीत वैद्यकीय क्षेत्रातील पदाधिकारी व‌ डॉक्टर यांनी सरकारी योजनांमधील त्रृटी व स्थानिक प्रशासनाकडून होणारी अडवणूक याबाबत समस्या मांडल्या.‌ यावरून संजोग वाघेरे पाटील यांनी लक्ष घालून त्या सोडविण्यासाठी कायम सोबत राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थितांना ॲड. सचिन भोसले, सूलभा उबाळे, मानव कांबळे, मारुती भापकर यांनी मनोगत व्यक्त करुन संजोग वाघेरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या  बैठकीचे संयोजन आकाश वाघेरे यांनी केले‌ होते.‌ मनीषा गरुड व अनिकेत अमृतकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. अर्चना वाघेरे यांनी आभार मानले.

Video News

अन्य बातम्या

व्यावसायिकांनी कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी - उप्र. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

मुंबई : मुंबई शहर व परिसरातील लोकसभेची निवडणूक पाचव्या टप्प्यांमध्ये 20 मे रोजी होणार आहे. त्या दिवशी व्यवसायकांनी आपल्या कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी. मतदान करणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असल्याने कामगार त्यापासून वंचित राहू नये याकरिता व्यवसायकांनी सहकार्य करावे असे आवाहन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी डॉक्टर दिनेश शर्मा यांनी केले आहे. नामदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील व्यवसायांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शर्मा उपस्थित होते. या बैठकीला हिरे व्यापारी व हिरे उद्योगपती मोठ्या संख्येने उपस्थित होते.       यावेळी बोलताना डॉक्टर दिनेश शर्मा म्हणाले, देशामध्ये पुन्हा मोदी सरकार येण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्यांनी व उद्योगपतीनी आपल्या कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावे तसेच त्यांचे मतदान करून घ्यावे. मुंबईतील मतदानाचा टक्का वाढवण्यात यावा. मंगल प्रभात लोढा म्हणाले, देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार येणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक उद्योगपतींनी आप आपल्या क्षेत्रांमधील उद्योगपती त्यांचे कामगार यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याबाबतची जागृती निर्माण करावी जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल व देशांमध्ये महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आपण संसदेमध्ये पाठवून मोदी साहेबांचे हात बळकट करू.         समस्त महाराजांचे ट्रस्टी परेश भाई शहा यांनी सांगितले की, आम्ही आमचे सर्व सहकारी अहोरात्र काम करून भारतीय जनता पक्षाचे मुंबईतले सर्व उमेदवार निवडून आणू. भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल म्हणाले, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाचे जास्तीत जास्त खासदार आणण्यासाठी मी व माझ्यासोबत सर्व उद्योगपती प्रयत्न करीत आहोत आणि या प्रयत्नामुळे मतदानाचा टक्का वाढेल. आम्ही सर्वजण महाराष्ट्रातले तसेच मुंबईतले भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्र पक्ष यांना जास्तीत जास्त मतदान कसं होईल त्याची दक्षता घेऊ. राष्ट्रीय सेवक संघाचे किरीट भाई शहा यांनी सर्वांचे आभार मानले.

Mavalmaza android application

Coming soon..