Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर डोंगरगाव वाडी जवळ कंटेनर अपघातानंतर आग; धडकेत एकाचा मृत्यू चार जण जखमी

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक भरधाव वेगातील कंटेनर सुरक्षा रेलिंग व पत्रे लावण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन धडकल्याने या अपघातात एका �

Expressway News | मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 18 व 19 मे रोजी गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी व दुरुस्ती कामासाठी ब्लॉक; पुणे मार्गिका राहणार बंद

पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी. क्र. 27/00 व कि.मी. क्र. 55/00 येथे 18 व 19 मे 2024 रोजी गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी व दुरु�

क्राईम न्युज

Lonavala News : वलवण बापदेव रोड वरील दुकानात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवण्याच्या प्रयत्न; घटना सीसीटिव्ही मध्ये कैद

लोणावळा : वलवण बापदेव रोडवरील एका जनरल स्टोअर मधील महिलेकडे पिण्याच्या पाण्याची बाटली मागण्याच्या बहाण्याने आलेल्या दुचाकी वरील दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रयत्न केला. रविवारी (19 मे) रात्री 8.36 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सुदैवाने तुटलेले मंगळसूत्र हे दुकानातच पडल्याने मोठी चोरी टळली. मात्र ही घटना व चोरट्याचा चेहरा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मागील काही दिवसात अशा प्रकारे चोरीचे प्रकार घडले आहेत. दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे ऐवज चोरण्याचा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी मॉर्निंग वॉक व रात्री जेवणानंतर शतपावली साठी अनेक नागरिक रस्त्यावर फिरत असतात. पोलिसांनी या घटनेची दखल घेत हद्दीत गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचे चेहरे व दुचाकी गाडी स्पष्ट दिसत असल्याने त्याचा आधार घेत शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मावळ

Maval News | अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने पॉली हाऊसचे होत्याचे नव्हते झाले; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यामध्ये गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अंदर मावळ येथील बेलज या गावातील शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊस चे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे पॉलिहाऊस चे शेड उडून गेल्याने व त्याचे होत्याचे नव्हते झाले असून शेतकरी उत्पादक सुभाष ओव्हाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.      ओव्हाळ यांनी मागील वर्षी स्वनिधीतून या पॉलिहाऊसची उभारणी केली होती. याकरिता कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नव्हते. मात्र वर्षभरातच नैसर्गिक आपत्तीमुळे पॉलिहाऊस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी सुभाष ओव्हाळ हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने तात्काळ या नुकसानीचा पंचनामा करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.           लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये गुरुवारी दुपारी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व वादळी वारा झाला. यामध्ये वडगाव भागातील एक होर्डिंग देखील पडले असून विजेचे अनेक खांब पडल्याने वडगाव परिसरातील वीजपुरवठा मागील 20 तासांपासून खंडित झाला आहे. होर्डिंग पडल्याने त्या भागात नुकसान देखील झाले आहे. तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडणे, शेड उडणे, झाडे तुटून पडणे आदी आपत्तीक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा शासनाने महसूल विभागाकडून पंचनामा करत नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी सर्व भागातून होत आहे.

पिंपरी चिंचवड

HSC RESULT : बारावीचा निकाल उद्या दुपारी ऑनलाईन जाहीर होणार

पुणे : महाराष्ट्र राज्य मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी (21 मे) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. परीक्षा दिलेल्या राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.या संकेतस्थळावर पाहता येतील गुणपत्रिकाविद्यार्थ्यांना दि. 21 रोजी मंगळवारी दुपारी 1 वाजल्यानंतर 1) mahresult.nic.in2) http://hscresult.mkcl.org 3) www.mahahsscboard.in4) https://results.digilocker.gov.in या संकेत स्थळांवर निकाल आणि गुण पाहता येतील आणि गुणपत्रिकेची प्रतही (प्रिंट आउट) घेता येईल.

Video News

अन्य बातम्या

आनंदवार्ता | मान्सून आज अंदमानात दाखल होणार

मावळ माझा न्युज नेटवर्क : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंद देणारी घटना म्हणजेच आज रविवारी (19 मे) मान्सून अंदामन मध्ये दाखल होणार आहे. तर केरळ मध्ये 31 मे पर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आवकाळी पाऊस सुरू आहे. सरासरी पेक्षा यावेळी जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.      दरवर्षी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 मे ते 3 जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो. दरवर्षी 21 मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मात्र 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे रोजी मान्सून आला होता. मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने म्हणजे 8 जूनला पोचला. यंदा त्यात काही बदल होतो का ते पाहावे लागणार आहे.

Mavalmaza android application

Coming soon..