Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

HSC RESULT : लोणावळा विभागाचा बारावीचा निकाल 95.11%

लोणावळा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी घोषित करण्य�

Lonavala : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर डोंगरगाव वाडी जवळ कंटेनर अपघातानंतर आग; धडकेत एकाचा मृत्यू चार जण जखमी

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक भरधाव वेगातील कंटेनर सुरक्षा रेलिंग व पत्रे लावण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन धडकल्याने या अपघातात एका �

क्राईम न्युज

भीषण अपघात | खंडाळा बॅटरी हील समोर कंटेनर कारवर उलटला; दोघांचा जागीच मृत्यू तर 6 जण जखमी

लोणावळा : मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा बॅटरी हिल या ठिकाणी वळणावर सोमवारी रात्री साडेदहा वाजता एक भीषण अपघात झाला. तीव्र वळणावर मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर हा पलटी होऊन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर पडल्याने कार पूर्णपणे दबली गेली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जण हे तळेगाव दाभाडे येथील असून अन्य चार जण जळगाव येथील आहेत. अलिबाग वरून ते तळेगावच्या दिशेने येत असताना काळ बनून आलेला कंटेनर त्यांच्या गाडीवर पलटी झाला.     याप्रकरणी किशोर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम 304 (अ) 279, 337, 338 मोटार वाहन अधिनियम 184,134 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.                                                    या भीषण अपघातात दत्तात्रय रामदास चौधरी (वय 55) व कवीता दत्तात्रय चौधरी (वय 46 वर्षे दोघेही रा. निमडाळे, जि. धुळे सध्या रा. देवकणपिंपरी, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला असून भुमीका दत्तात्रय चौधरी (वय 16 वर्षे), मितांश दत्तात्रय चौधरी (वय 9 वर्ष, दोघेही रा. निमडाळे, जि. धुळे सध्या रा. देवकणपिंपरी, जि. जळगाव), योगेश श्रीराम चौधरी (वय 40 वर्षे), जान्हवी योगेश चौधरी (वय 31 वर्षे), दिपांशा योगेश चौधरी (वय 9 वर्ष), जिगीशा योगेश चौधरी (वय 1.5 वर्षे चौघेही राहणार संस्कृती बिल्डींग राव कॉलनी तळेगाव, ता. मावळ) हे जखमी झाले आहेत.      लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (20 मे) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनर (MH 14 FT 1445) वरील चालकाचा खंडाळा बॅटरी हिल येथील उतार व वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने सदरचा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणारी कार (MH 14 BX 1605) वर पलटी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कार कंटेनरच्या खाली पूर्णपणे दबली गेली. या अपघातात कारच्या चालकासह एका महिलेचा मृत्यू झाला तर गाडीमधील अन्य सहा जण जखमी झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संघटनेचे स्वयंसेवक, खंडाळा व बॅटरी हिल भागातील नागरिक, लोणावळा पोलीस, खंडाळा महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या व पुलरच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करत त्याच्याखाली अडकलेली कार व कार मधील नागरिकांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.      या भीषण अपघाताच्या घटनेचा तपास लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड हे करत आहेत.

मावळ

HSC RESULT : मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.72 टक्के

लोणावळा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात फेब्रुवारी - मार्च 2024 रोजी आलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.72 टक्के लागला आहे. मावळ तालुक्यातील 4065 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 3791 विद्यार्थी पास झाले आहेत. 299 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये आले असून 993 विद्यार्थी प्रथम क्षेणीत पास झाले आहेत.

पिंपरी चिंचवड

HSC RESULT : बारावीचा निकाल उद्या दुपारी ऑनलाईन जाहीर होणार

पुणे : महाराष्ट्र राज्य मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी (21 मे) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. परीक्षा दिलेल्या राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.या संकेतस्थळावर पाहता येतील गुणपत्रिकाविद्यार्थ्यांना दि. 21 रोजी मंगळवारी दुपारी 1 वाजल्यानंतर 1) mahresult.nic.in2) http://hscresult.mkcl.org 3) www.mahahsscboard.in4) https://results.digilocker.gov.in या संकेत स्थळांवर निकाल आणि गुण पाहता येतील आणि गुणपत्रिकेची प्रतही (प्रिंट आउट) घेता येईल.

Video News

अन्य बातम्या

आनंदवार्ता | मान्सून आज अंदमानात दाखल होणार

मावळ माझा न्युज नेटवर्क : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंद देणारी घटना म्हणजेच आज रविवारी (19 मे) मान्सून अंदामन मध्ये दाखल होणार आहे. तर केरळ मध्ये 31 मे पर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आवकाळी पाऊस सुरू आहे. सरासरी पेक्षा यावेळी जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.      दरवर्षी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 मे ते 3 जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो. दरवर्षी 21 मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मात्र 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे रोजी मान्सून आला होता. मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने म्हणजे 8 जूनला पोचला. यंदा त्यात काही बदल होतो का ते पाहावे लागणार आहे.

Mavalmaza android application

Coming soon..