Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala Good News l लोणावळ्यातील विशाखा पालकर पुणे आयडॉल 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल

लोणावळा : लोणावळ्यातील विशाखा रवींद्र पालकर ही पुणे आयडॉल 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. पुण्यातील सनी विनायक लिम्हण यांच्या सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुणे आयडॉल 2024 चे आयोजन क�

निधनवार्ता l इंदिरानगर येथील अशोक मोहोळ यांचे निधन

लोणावळा : इंदिरानगर, न्यू तुंगार्ली येथील अशोक केशव मोहोळ यांचे आज वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा अविनाश मोहोळ, दोन मुली, पुतण्या विकी मोहोळ असा मोठा परिवार आहे.

क्राईम न्युज

मोठी बातमी l कुसगाव भैरवनाथनगर परिसरात दोन घरफोड्या; 6 लाखांचा मुद्देमाल लंपास

लोणावळा : कुसगाव भैरवनाथनगर परिसरात शुक्रवारी (24 मे) रात्री व 22 ते 25 मे दरम्यान झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये तब्बल अडीच लाखांची रोकड व सोन्याचा ऐवज असा मिळून 6 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.     याप्रकरणी दत्तात्रय शंकर गरवड (वय 40, रा. आयप्पा मंदिराशेजारी, भैरवनाथ नगर कुसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      दत्तात्रय गरवड हे 24 मे रोजी कुटुंबासह पांगोळी येथील फार्म हाऊस वर गेले असताना, त्यांच्या बंद घराचा सेफ्टी दरवाज्याचा कडी कोयंडा तोडत घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी घरातील लाकडी कपाटातील दोन लाख रुपये रोख रक्कम व 3 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. तसेच त्यांच्या घराजवळ असलेल्या के. के. मार्केट शेजारील गोविंद अपार्टमेंट मधील मच्छिंद्र सुर्वे यांच्या तळमजल्यावरील घराच्या सेफ्टी दरवाज्याचा कोयंडा तोडत घरात प्रवेश करत त्यांच्या घरातील 50 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असे 1 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.    लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या दोन्ही घटनांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले घटनेचा तपास करत आहेत.

मावळ

दुःखद घटना l कासारसाई धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू

तळेगाव दाभाडे : कासारसाई धरणात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी (29 मे) दुपारी घडली आहे.     मुरली कृष्णा बोला (वय 21, रा. कोरेगाव पार्क, पुणे; मूळ रा. आंध्र प्रदेश) आणि कुणाल सर्वेश दुबे (वय 21, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.   मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका महाविद्याल्यातील चार विद्यार्थी आज दुपारी कासारसाई येथील धरणावर आले होते. पाण्याचा आनंद घेण्यासाठी ते पाण्यात उतरले होते मात्र खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. इतर दोन विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यश न आल्याने काही नागरिकांनी शिरगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली तसेच मावळ वन्यजीव रक्षक टीमला याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर बचाव पथकाने पोलिसांच्या समवेत कासारसाई धरणावर येत शोध मोहीम राबवली. साडेतीन वाजण्याच्या सुमारास बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी शिरगाव पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

पिंपरी चिंचवड

HSC RESULT : बारावीचा निकाल उद्या दुपारी ऑनलाईन जाहीर होणार

पुणे : महाराष्ट्र राज्य मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी (21 मे) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. परीक्षा दिलेल्या राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.या संकेतस्थळावर पाहता येतील गुणपत्रिकाविद्यार्थ्यांना दि. 21 रोजी मंगळवारी दुपारी 1 वाजल्यानंतर 1) mahresult.nic.in2) http://hscresult.mkcl.org 3) www.mahahsscboard.in4) https://results.digilocker.gov.in या संकेत स्थळांवर निकाल आणि गुण पाहता येतील आणि गुणपत्रिकेची प्रतही (प्रिंट आउट) घेता येईल.

Video News

अन्य बातम्या

Breaking News l मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी आठ ते नऊ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक अतिशय संत गतीने सुरू असून अमृतांजन फुल ते खालापूर टोल नाका अशा साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना खंडाळा बोगद्याजवळ थांबवत सर्व सहा लेन या पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी काही वेळेचा ब्लॉक घेत सोडण्यात येत आहेत. तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहने ही लोणावळा एक्झिट या ठिकाणी थांबवण्यात आली आहेत.       शनिवार रविवारच्या सुट्टया असल्याने या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक खाजगी वाहनांमधून घराबाहेर पडले आहेत. त्यातच रेल्वेच्या देखील ब्लॉकमुळे काही गाड्या बंद असल्याने त्याचा अतिरिक्त ताण हा रोड वाहतुकीवर आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटुंबांसह व मुलांसह थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा यासह कोल्हापूर, नाशिक या भागांमध्ये पर्यटनासाठी जात आहेत. तसेच कोकण किनारपट्टीला जाणारे अनेक पर्यटक हे कराड व कोल्हापूर मार्गे जात असल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आज पहाटेपासुनच मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडीमुळे झाली आहे.

Mavalmaza android application

Coming soon..