Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Expressway News | मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 18 व 19 मे रोजी गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी व दुरुस्ती कामासाठी ब्लॉक; पुणे मार्गिका राहणार बंद

पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी. क्र. 27/00 व कि.मी. क्र. 55/00 येथे 18 व 19 मे 2024 रोजी गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी व दुरु�

लोणावळा नगरपरिषदेकडून इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाला वेग; आता पॅचवर्क चे काम लवकर मार्गी लावा

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेकडून इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाला वेग आला आहे. लोणावळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने शहरातील नदीपात्र व नाले यांची स्वच्�

क्राईम न्युज

Expressway Accident | मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर तीन वाहनांचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी

खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास किलोमीटर 38/200 जवळ तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर खोपोली व एमजीएम रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.      मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी (10 मे) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक क्रमांक (KA - 56 - 3277) किमी 38/200 जवळ आला असताना ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून ट्रक पुढे चालणाऱ्या कोंबडी वाहून  नेणाऱ्या टेम्पो क्रमांक MH-03-CP- 2428 व ओमनी क्र. MH -11- Y- 7832 या वाहनांना ट्रकची जोरात धडक दिली.     या भीषण अपघातात ओमनी कार मधील 2 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पो मधील 2 जण गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी आहेत. ट्रक मधील 1 जण मयत व 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी एमजीएम हाॅस्पीटल पनवेल आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.      अपघाताची माहिती समजताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी कडील देवदूत टिम, आयआरबी पेट्रोलींग टिम, मृत्युंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची 108 ॲम्बुलन्स सेवा यांनी मदतकार्य केले. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मदत यंत्रणेने व पोलीस यंत्रणा यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत काही वेळानंतर ही वाहतूक सुरळीत सुरू केली. या अपघाताचा अधिक तपास खोपोली पोलीस करत आहेत.

मावळ

Maval News | अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने पॉली हाऊसचे होत्याचे नव्हते झाले; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यामध्ये गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अंदर मावळ येथील बेलज या गावातील शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊस चे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे पॉलिहाऊस चे शेड उडून गेल्याने व त्याचे होत्याचे नव्हते झाले असून शेतकरी उत्पादक सुभाष ओव्हाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.      ओव्हाळ यांनी मागील वर्षी स्वनिधीतून या पॉलिहाऊसची उभारणी केली होती. याकरिता कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नव्हते. मात्र वर्षभरातच नैसर्गिक आपत्तीमुळे पॉलिहाऊस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी सुभाष ओव्हाळ हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने तात्काळ या नुकसानीचा पंचनामा करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.           लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये गुरुवारी दुपारी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व वादळी वारा झाला. यामध्ये वडगाव भागातील एक होर्डिंग देखील पडले असून विजेचे अनेक खांब पडल्याने वडगाव परिसरातील वीजपुरवठा मागील 20 तासांपासून खंडित झाला आहे. होर्डिंग पडल्याने त्या भागात नुकसान देखील झाले आहे. तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडणे, शेड उडणे, झाडे तुटून पडणे आदी आपत्तीक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा शासनाने महसूल विभागाकडून पंचनामा करत नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी सर्व भागातून होत आहे.

पिंपरी चिंचवड

संजोग वाघेरे यांची महाराष्ट्रातील जाहीर झालेली पहिली उमेदवारी आहे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करत गद्दारांना घरी बसवा - उद्धव ठाकरे

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची महाराष्ट्रातील जाहीर झालेली पहिली उमेदवारी आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांचा प्रचार सुरू असून ते मावळ लोकसभा मतदारसंघात घराघरात पोहोचले आहेत. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करत गद्दारांना घरी बसवण्याची ही निवडणूक असल्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरी येथील सभेत शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये आलो आहोत. आमचा पक्ष व पक्षाचे चिन्ह चोरण्याचा प्रयत्न भाजपा व मिंदे यांनी केला आहे. ज्या शिवसेनेकडे संपूर्ण महाराष्ट्र व देश मराठी समाजाची अस्मिता म्हणून पहात होता. ज्या बाळासाहेबांचे आर्शिवाद घेऊन भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली. मोदी पंतप्रधान झाले, आम्ही त्यांना आलिंगन दिले व त्यांनी पाठीत वार केला. शिवसेनेला फोडण्याचे पातक भाजपने केले आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही. ज्या गद्दारांनी त्यांना साथ दिली त्या गद्दारांना गाडल्याशिवय हा महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही. अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ज्याप्रमाणे मोदी सरकार यांनी अचानकपणे नोटाबंदी करत चलनात असलेल्या नोटांची रद्दी केली त्याचप्रमाणे चार जूनच्या निकालानंतर मोदी नावाचे नाणे चलनातून बंद होईल व ते फक्त नरेंद्र मोदी म्हणून राहतील असा हल्लाबोल या सभेत ठाकरे यांनी केला आहे.        मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या  प्रचारार्थ सांगवी येथील पी.डब्लु. डी. मैदानावर (इंडिया) महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली. मावळवासियांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत असलेली निष्ठा आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्यावर असलेलं प्रेम ह्या सभेत स्पष्ट दिसून आलं. सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, आप पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, शिवसेना संघटक व आमदार सचिन अहिर, जिल्हाप्रमुख व माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम,  शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले आदीसह इंडिया - महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. संजोग वाघेरे हा विकासाचा ध्यास असलेला चेहरा असल्याने मावळ लोकसभा मतदार संघातील मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे.     यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याकडे साधारणपणे भुताची भीती असते, भाजपाला पराभवाच्या भुताची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान गल्लीबोळात रोड शो करत आहेत. जनतेने आणले का नाही रस्त्यावर?  शिवसेनेची भडकलेली मशाल हुकूमशाही मोदी सरकारचे आसन जाळून भस्मसात करेल. महाराष्ट्र हा मर्दांचा प्रांत आहे. महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असे इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'भाजपसमोर 2014 व 2019 नंतर आता कोणतेच मुद्दे नाहीत. म्हणून हिंदू मुस्लिम असा जातीयवाद केला जात आहे. नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग होता, असे सर्वोच्च न्यायालयातील एका माजी न्यायाधीशांनी सांगितले आहे. खरे तर हे गजनी सरकार आहे. कारण प्रत्येक वेळी वेगळे बोलताना, मागे काय बोलले होते त्याची त्यांना आठवण होत नाही म्हणून मागील दहा वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनांवर ते बोलायला तयार नाही.         अग्निविरांच्या माध्यमातून त्यांनी जवानांच्या भविष्यांशी खेळण्याचे धोरण आखले आहे, संरक्षण विभागाचे कंत्राटीकरण केले जात आहे. त्यामुळे राम कृष्ण हरी अन पाठवा त्यांना घरी! असे जनताच म्हणत आहे. ठाकरे म्हणाले, मुबंईत गुजरातची कंपनी मुंबईमध्ये मराठी माणसांना प्रवेश नाही, अशी जाहिरात देते. ही कसली मानसिकता. आम्ही गुजराती बांधवांच्या विरोधात नाही, पण अशा मानसिकतेच्या विरोधात मराठी माणूस पेटून उठेल. महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्यांना व शिवसेनेचे तुकडे करणाऱ्या गद्दारांना जनता आता माफ करणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Video News

अन्य बातम्या

निधनवार्ता | वाकसई चाळ येथील सीताबाई धोंडीबा विकारी यांचे निधन

लोणावळा : वाकसई चाळ येथील हभप सीताबाई धोंडीबा विकारी यांचे रविवारी (12 मे) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मावळ तालुक्यातील प्रसिध्द मृदुंगमनी व नवमी भजनी मंडळाचे माजी अध्यक्ष हभप धोंडीबा महाराज विकारी यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यावर सोमवारी वाकसई येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात उद्योजक जनार्दन विकारी, एकनाथ विकारी असे दोन मुलगे, दोन मुली, सूना, नातवंडं असा मोठा परिवार आहे. येत्या 24 मे रोजी त्यांचा तेरावा विधी, माळेचा कार्यक्रम होणार आहे.

Mavalmaza android application

Coming soon..