Breaking news

शिवसेनेला धक्का; पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा भाजपात प्रवेश

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शिवसेनेला भाजपने भागदाड पडले असून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पती आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

   गजानन चिंचवडे हे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक होते. त्याच्या पत्नी शिवसेनेच्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. गत स्थायी समितीच्या सदस्य पदावर ऐनवेळी त्याचा पत्ता कट झाला. त्यानंतर त्याची पक्षात घुसमट वाढली असावी, त्याच नाराजीचा फटका म्हणून त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत जय श्रीरामचा नारा दिला असावा अशी चर्चा पिंपरी चिंचवड शहरात सुरू आहे.

   मुंबई येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी गजानन चिंचवडे यांनी चाफेकर स्मारकाची प्रतिकृती देत भाजपचे कमळ हातात घेतले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

इतर बातम्या