Breaking news

संपर्क संस्था ग्रामीण भागातील हजारो युवकांना देतेय कौशल्य प्रशिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास

लोणावळा : संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी 1994 साली ग्रामीण भागातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहून यशस्वी उद्योजक बनावे या उद्देशाने मळवली येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय सुरु केले आहे. आज या प्रशिक्षण संस्थेत हजारो विध्यार्थी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय करत आहे तर अनेक विद्यार्थी मोठं मोठ्या कंपनी मध्ये काम करत आहे.

      संपर्क प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रिशन, वायरमन, फिटर, वेल्डर, दुचाकी वाहन मेकॅनिक, शिलाई, फॅशन डिझाईनिंग, बुटीपार्लर, कुकरी, बेकरी, टेलीएम, एस आय टी, एम. एस ऑफिस सारखे विविध कम्प्युटर शासन मान्य कोर्स सुरु आहेत. विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रदान करून संपर्क संस्थेने 12,674 युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अनेक विद्यार्थी नामांकित कंपन्यामध्ये काम करत आहेत. 

       दहावी नंतर संपर्क मध्ये आय टी आय किंवा व्हिटीसी चे MSIT, इलेक्ट्रिक, वायरमन, बेसिक फूड प्रॉडक्ट, MS ऑफिस, टेलरिंग, ब्युटी पार्लर अश्या कोर्स साठी प्रवेश घेऊ शकतात येथे अनुभवी शिक्षक, आधुनिक अध्यापन तंत्र, सर्वसमावेशक अभ्यासक्रम व इतर सुसज्ज व्यवस्था आहे. सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्द राहून ना नफा ना तोटा या तत्वावर संस्था गेली 33 वर्षे बाल संगोपन, शिक्षण व पुनर्वसनाचे काम करत आहे. मळवली येथील औद्योगिक व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांना कौशल्यपूर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे. युवक व युवतींनी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. प्रवेशाकारिता संपर्क - 9158580801 व 7028256155

इतर बातम्या