Breaking news

monsoon Update : पुणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस हवामान विभागाकडून रेड अलर्ट (Red Alert) जारी

पुणे : हवामान विभागाकडून 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरु असून पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात हा रेड अलर्ट असल्याने नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे तसेच पर्यटनस्थळे व धबधबे याठिकाणी जाणे अथवा वात्सव्य करणे टाळावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा प्रशासन पुणे यांनी केले आहे.

इतर बातम्या