Breaking news

Maval Murder Case : मावळातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी लक्ष घालणार - रुपाली चाकणकर - महिला आयोग अध्यक्षा

लोणावळा : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तीची हत्या केल्याची घटना घडली आहे. आज गावात जाऊन पिडित कुटुंबाची भेट घेतली. चिमुकलीच्या कुटुंबियाचा आक्रोश सुन्न करणारा होता. ही घटना या गावावर आघात करणारी आहे. गावातील लोकांनी नराधम आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवत हा खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालावा यासाठी मी लक्ष घालणार असल्याचे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. तसेच पोलीस प्रशासनाला तातडीने तपास पुर्ण करुन चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. चाकणकर यांनी आज मयत मुलीच्या नातेवाइकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

इतर बातम्या