Breaking news

Maval Good News : पद्मावती विद्या मंदिरचे शिक्षक अशोक काळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

लोणावळा : पद्मावती विद्या मंदिर व ज्युनिअर काॅलेज उर्से या शाळेचे सहशिक्षक अशोक श्रीराम काळे यांना नुकताच जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. काळे सर हे मागील 20 वर्षापासून इंग्रजी अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सदरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या वतीने भोर येथील भोरेश्वर लॉन्स मंगल कार्यालय येथे रविवारी (दि.2) सदर पुरस्कार आमदार संग्राम दादा थोपटे तसेच टीडीएफचे राज्य कार्याध्यक्ष जी.के. थोरात, महाराष्ट्र राज्य विश्वस्त के एस ढोमसे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

इतर बातम्या