Breaking news

Karla News : कार्ला विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी प्रशांत हुलावळे तर व्हाईस चेअरमनपदी रामचंद्र येवले बिनविरोध

कार्ला (प्रतिनिधी) : शिलाटणे, वेहेरगाव, दहिवली, कार्ला या चार गावांची मिळून कार्ला विविध कार्यकारी सोसायटी असून या सोसायटीच्या अध्यक्षपदी कार्ला येथील  प्रशांत शंकरराव हुलावळे तर व्हाईस चेअरमनपदी दहिवली येथील रामचंद्र विष्णू येवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव येथील निबंधक कार्यालयात निर्धारीत वेळेत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रशांत हुलावळे व रामचंद्र येवले यांंचे एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी कोतकर यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

     गेल्या महिन्यात सर्वपक्षीय नेते मंडळीच्या सहकार्याने सोसायटी संचालक निवडणुक बिनविरोध करण्यात आली होती. आज पुन्हा चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक देखील सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.

निवडणुक बिनविरोध करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य भरतभाई मोरे, मिलिंद बोत्रे, पुणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, राष्ट्रवादीचे  दिपक हुलावळे, मावळ तालुका सचिव संघटना अध्यक्ष गणपत भानुसघरे, माजी चेअरमन खरेदी विक्री संघ बाळासाहेब भानुसघरे, शिवसेना मावळ संघटक सुरेश गायकवाड, माजी चेअरमन किरण हुलावळे, मधुकर पडवळ, शरद कुटे, प्रदिप हुलावळे, सचिन येवले, तानाजी भानुसघरे, भाऊसाहेब हुलावळे, तानाजी पडवळ, भरत कोंढभर, एकनाथ गायकवाड यांंच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले.

      नवनियुक्त चेअरमन प्रशांत हुलावळे व व्हाईस चेअरमन रामचंद्र येवले यांंचा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक किरण हुलावळे, भाऊसाहेब मावकर, ज्ञानेश्वर (बाळु) भानुसघरे, दत्तात्रय पडवळ, राजु देवकर, पांडुरंग भानुसघरे, दत्तात्रय हुलावळे, किसन आहिरे, सायली बोत्रे, रंजना गायकवाड सोसायटीचे सचिव सचिन भानुसघरे यांनी अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी मावळ सहकार आघाडीचे अध्यक्ष नंदकुमार पदमुले, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भरत येवले, अमोल केदारी, अशोक कुटे, जितेंद्र बोत्रे, सुभाष हुलावळे, बाळकृष्ण कोंढभर, संदिप देवकर, सचिन वाडेकर, राजु हुलावळे, सागर शिंदे, सुनिल येवले, संतोष हुलावळे, अमोल हुलावळे, तानाजी कुटे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या