Breaking news

शनिवार रविवारी मेडिकल व दुध विक्रीची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद राहणार जिल्हाधिकार्‍यांचा सुधारित आदेश

लोणावळा : कोरोनाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध व शनिवार रविवार संपुर्ण लाँकडाऊन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 4 एप्रिल रोजी जाहिर केला आहे. तर पुणे जिल्हाधिकारी यांनी 5 एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित केले होते. आज यामध्ये काही सुधारणा करून जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सुधारित आदेश जाहिर केला आहे.

   यानुसार शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 7 या संचारबंदीच्या काळात मेडिकल दुकाने व दुध विक्रीची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत. शनिवार व रविवारी दुध विक्रीची दुकाने सकाळी 6 ते 11 यावेळी सुरू राहणार आहेत.

    नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीत कोव्हीड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

1} पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील विद्याथ्यांना परीक्षार्थीना सर्व प्रकारच्या परीक्षा / स्पर्धा परीक्षेकरिता घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत / परीक्षा केंद्रापासून घरापर्यंत सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते सकाळी 7 पर्यंत तसेच शुक्रवार सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत (संचारबंदीच्या काळात) प्रवास कारणेस परवानगी राहील. परीक्षार्थी सोबत त्यांचे पालक यांना देखील प्रवास करणेस परवानगी राहील, मात्र विद्याध्यांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रवास करताना सोबत परीक्षेचे हॉल लिकिट (Admit Card ) बाळगावे तसेच या सवलतीचा गैरयापर टाळावा. 

2} शुक्रवार सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 या संचारबंदीच्या काळात मेडिकल, दुध विक्री दुकाने वगळून सर्व दुकाने बंद राहतील. दुध विक्रीची दुकाने सकाळी 6 ते 11 या वेळेत सुरु राहतील,

3} पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा पुरवठा करणारे कंपनी ई- कॉमर्स) (Swiggie, Zomato, इ.) यांना आठवड्यातील सर्व दिवस प्रवास करणेस परवानगी राहील, शुक्रवार सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 या संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांना हॉटेलमध्ये जावून पार्सल घेणेस प्रतिबंध राहील. हॉटेल, रेस्टॉरंट, बार मार्फत घरपोच पार्सल सेवा सुरु राहतील.

 4} पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस / नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी राहील.

5} स्पर्धा परीक्षा असल्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील खानावळी (मेस) या फक्त पार्सल सेवेसाठी सर्व दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 8 या वेळेत सुरु राहतील.

6} लसीकरण सुविधा आठवडयातील सर्व दिवस सुरु राहतील.

7} पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था (In site Labour) आहे असे बांधकाम शनिवार व रविवार सुरु ठेवता येईल.

8} पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील मद्य  विक्रीची दुकाने राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार राज्य उत्पादक शुल्क विभागाने विहीत केलेल्या वेळेनुसार सुरु राहतील.

9} पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहतील.

10} पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक (PMPML) अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार व रविवार बंद राहिल. मात्र ओला व उबेर या सारख्या टॅक्सी सेवा अत्यावश्यक कारणासाठी सुरु राहतील.

11} या कार्यालयाकडील दिनांक 5/4/21 अन्वये ज्या उद्योग / आस्थापना यांनी त्यांचे कर्मचार्‍यांना कोविड 19 निगेटिव्ह (RTPCR) प्रमाणपत्र सोबत ठेवण्याचे आदेशित केले आहे. तसेच त्यांना Rapid Antigen Test करून कोव्हिड-19 निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगल्यास परवानगी ग्राहय राहील.

12} सदर आस्थापनावरील कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. तोपर्यंत त्यांनी कोव्हिड-19 निगेटिव्ह ( RTPCR/ RAT) असल्याचे 15 दिवसांची वैधता असणारे सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

13} आदेशामध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे याबाबत स्थानिक प्रशासनाकडून तपासणी करण्यात यावी.

    सदर आदेशाची अंमबजावणी दिनांक 9/4/2021 पासून ते दिनांक 30/4/2021 रोजी पर्यंत लागू राहतील, उपरोक्त आदेशाचे पालन न करणार्‍या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंडसंहिता 1860 यांच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कार्यवाही करण्यात यावी.

इतर बातम्या