Ajit Dada Pawar : होय ! मला 100 टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल…

पिंपरी चिंचवड : 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असताना मुख्यमंत्री पद घेतले नाही, ही आमची सर्वात मोठी चूक होती. असे सांगत आता मला 100 टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड येथे आयोजित एका मुलाखतीत अजितदादा यांनी ही रोखठोक भूमिका मांडली. दोन महिन्यापूर्वी देखील दादांनी हीच भूमिका स्पष्ट केली होती. अजितदादा म्हणाले 2004 साली राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असताना देखील वरिष्ठाच्या आदेशानुसार मी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. व आता देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. खरेतर या दोन्ही नेत्यांना आमदारकीचा अनुभव नव्हता. तरी त्यांच्या सोबत मी आनंदाने काम केले. आता मला मुख्यमंत्री व्हायला शंभर टक्के आवडेल. 2004 साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता तर राज्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद आज अधिक वाढली असती असे सांगितले.