Breaking news

Karla News l कार्ल्यात भैरवनाथ उत्सवानिमित्त रंगला कुस्त्यांचा आखाडा; यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कार्ला (प्रतिनिधी) : येथील ग्रामदेवत श्री भैरवनाथाचा उत्सव पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी पौष पोर्णिमेला उत्सवाला सुरवात झाली. 

      13 जानेवारी रोजी सकाळ पासून ग्रामदेवत भैरवनाथचे दर्शन घेण्यासाठी एम टी डी सी येथील भैरवनाथ मंदिरात भाविकांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी चार वाजता देवाच्या पालखीला ढोल ताशा, बँड पथकाच्या गजरात फटाक्यांची अतिषबाजी करत मिरवणूकीला सुरवात झाली. संपूर्ण गावात पालखीचे स्वागत करत गावातील सुवासिनीनीं देवाची पुजा केली. शेवटी पुन्हा पालखी गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. रात्री दहा वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गाजत असलेली नृत्यगंना राधा पाटील मुंबईकर हिच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.

    बुधवारी 15 जानेवारी रोजी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता. शंभर रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत इनाम असलेल्या नामवंत कुस्त्या या आखाड्यात पार पडल्या. कार्ला पंचक्रोशीतील मल्लांसह मावळ, मुळशी, हवेली, कर्जत, कल्याण पुणे, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, हरियाणा येथील मल्लांनी या आखाड्यात सहभाग घेऊन कुस्त्यां मध्ये रंगत आणली. यावेळी परिससरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थितीत होते. भैरवनाथ उत्सवाचे संयोजन कार्ला गावातील युवकांच्या व ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून करण्यात आले होते.

इतर बातम्या