Breaking news

INDIAN AIRLINE : WELCOME TO TATA - एअर इंडियाची घरवापसी; टाटाने स्थापन केलेली कंपनी पुन्हा टाटाकडे

मुंबई : "WELCOME BACK" हे शब्द आहेत, टाटा कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे. भारतातील सर्वात मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडे आली आहे. या संदर्भात पहिली प्रतिक्रिया देताना रतन टाटा म्हणाले 1932 साली टपाली वाहतुकीपासून सुरु केलेली ही कंपनी सरकारने राष्ट्रीयीकरण करून ताब्यात घेतली होती, आता पुन्हा ती कंपनी टाटा समूहाकडे आली असून तिचे सारथ्य करत तिला नव्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आमची आहे. सरकारच्या मालकीची असलेली सार्वजनिक वाहतूक कंपनी एअर इंडियाची अखेर टाटा सन्सने खरेदी केली आहे. जनमाणसाकडून एअर इंडिया टाटाकडे जावी अशी इच्छा वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली होती. टाटाने स्थापन केलेली कंपनी त्यांच्याकडे आल्याने खर्‍या अर्थाने एअर इंडियाची घरवापसी झाली आहे. 

   एअर इंडियावर प्रचंड कर्ज झाले होते. केंद्र सरकारकडून सुमारे 20 वर्षापासून एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी प्रयत्न सुरु होते. मोदी सरकारने मात्र संपुर्ण विक्रीचा निर्णय घेतला होता. 

     एअर इंडिया कंपनीवे 61 हजार 262 कोटी रुपयांचे कर्ज होते. टाटा समुहाने स्थापन केलेल्या या कंपनीसोबत टाटा समुहाचे भावनिक नातं असल्याने त्यांनी सर्वांधिक 18 हजार कोटीची बोली लावली होती. त्या खालोखाल स्पाईस जेट ने 15 हजार 100 कोटीची बोली लावली होती. एअर इंडियाकडे सध्या 12 हजार 85 कर्मचारी असून त्यांना किमान एक वर्ष कामावर ठेवावे लागणार आहे. त्यानंतर स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय खुला असणार आहे. एअर इंडियाकडे 172 विमाने आहेत. 

टपालासाठी पहिले उड्डाण 

जे.आर.डी. टाटा हे स्वतः निष्णात वैमानिक होते. त्यांनी कंपनीला सर्वप्रथम टपाल वाहतुकीसाठी परवानगी मिळविली. 15 आँक्टोबर 1932 रोजी कराची ते मुंबई हे पहिले विमान त्यांनी स्वतः उडविले. त्यानंतर मुंबई ते त्रिवेंद्रम असे पहिले व्यावसायिक विमान झेपावले. 

इतर बातम्या