Breaking news

पवना नदी काठच्या गावांना सर्तक राहण्याचा इशारा

लोणावळा : पावसाचा जोर सुरू असल्याने पवन मावळातील पवना धरणात 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच शंभर टक्के भरणार असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने पवना नदी काठावरील गावांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी केले आहे.

     पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीचे दोन महिने पावसाने ओढ दिल्याने मावळातील धरणे भरतील का नाही अशी शंका असताना आँगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने मावळ तालुक्यातील पवना धरण 95 टक्के भरले आहे. लवकरच धरण शंभर टक्के भरणार आहे. धरण भरल्यानंतर लगेच पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने नदी पात्रालगत असलेल्या गावांनी खबरदारी घ्यावी, सर्व नागरीकांनी सतर्क रहावे, नदी तीरा वरील सर्व साधन सामुर्गी, वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हालविण्यात यावे जेणे करून कुठल्याही प्रकारची हानी हाेणार नाही याची काळजी घेण्यात यावी व जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे आवाहन शेटे यांनी केले आहे.

इतर बातम्या