Breaking news

मावळ तालुक्यातील खालील लसीकरण केंद्रावर उद्या बुधवारी लस मिळणार आहे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील खालील लसीकरण केंद्रावर बुधवारी (4 आँगस्ट) रोजी लस उपलब्ध असणार आहे.

    कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव व तळेगाव रिक्रेशन हाॅल, टाकवे व आढले प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडाळा प्राथमिक आरोग्य पथक, लोणावळा शहरातील शंखेश्वर रुग्णालय, एल अँन्ड टी व रेल्वे दवाखान्यात लसीचे दोन्ही डोस उपलब्ध असणार आहे.

    तर प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला, उपकेंद्र वडगाव व अजिवली, ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे येथे कोव्हिशिल्ड लसीचा फक्त दुसरा डोस उपलब्ध असणार आहे. 

   प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणाऱ्या उपकेंद्रांबाबत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे लस उपलब्धतेनुसार नियोजन करतील

कोव्हॅक्सीन या लसीचा प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा येथे फक्त दुसरा डोस असणार आहे. मावळ तालुका आरोग्य विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

इतर बातम्या