Breaking news

मावळातील लसीकरण केंद्र मंगळवारी पुन्हा बंद राहणार आहेत

लोणावळा : कोरोना लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने मावळ तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्र मंगळवारी (3 आँगस्ट) रोजी पुन्हा बंद राहणार आहेत. मावळ तालुका आरोग्य विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

     लसीचा लपंडाव सुरू असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांची घालमेल होत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी 84 दिवसांची प्रतिक्षा केल्यानंतरही लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाने लसीचे योग्य नियोजन करून त्यांचे तालुका निहाय वाटप करावे अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस ग्रामीण रुग्णालय वडगाव, कान्हे येथे सुरू असणार आहे.

इतर बातम्या