Breaking news

Lonavala Crime News : लोणावळ्यात दोघांना चाकूचा धाक दाखवत लुटले; 1 लाख 12 हजारांचा मुद्देमाल लंपास

लोणावळा : लोणावळा शहरातील सहारा पुल भागात फिरायला गेलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची (Lonavala Crime News) घटना रविवारी 22 जानेवारी रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. 

    सलमान उस्मान खान (वय 19, व्यवसाय शिक्षण रा. टेबल चाळ जी वार्ड लोणावळा) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सलमान व त्याची मैत्रिण हे काल रात्री लोणावळा ब्रिजच्या पुढे फिरायला गेले असताना त्याठिकाणी असलेल्या तीन अनोळखी व्यक्तीनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच सलमान याच्या हातावर चाकूने वार करुन गंभिर जखमी करत त्याच्या जवळील आय फोन, त्याच्या मैत्रिणी कडील सोन्याची दोन तोळ्याची चैन व चांदीची अंगटी असा 1 लाख 12 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेत लुटला. 

    सलमान याने दिलेल्या फिर्यादीवरून सदर प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे तपास करत आहेत.

इतर बातम्या