Breaking news

Accident Breaking : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अंडा पाॅईटजवळ ट्रेलर व टेम्पोचा भिषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रेलरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदरचा ट्रेलर समोर जाणार्‍या टेम्पोला धडकून पलटी झाला. टेम्पो देखील या धडकेने पलटी झाला. या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजुला करण्यात आली आहेत.

     मिळालेल्या माहितीनुसार लोखंडी काॅईल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असलेल्या ट्रेलर चालकाचा अंडा पाॅईट येथील उतार व वळणावर गाडीवरील ताबा सुटला, भरधाव वेगातील या ट्रेलरने समोरील टेम्पोला धडक दिली. या धडकेत टेम्पो पलटी झाला तसेच ट्रेलर देखील पलटी झाला. केबिनचा चक्काचूर झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दोन्ही वाहने रस्त्यात असल्याने मोठी वाहतूककोंडी झाली होती. तर घाटात कोंडी झाली असल्याचे समजल्याने अनेक वाहनांनी खोपोली व लोणावळा शहरातून प्रवेश केल्याने जुन्या राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजुला काढण्यात आली असून एक्सप्रेस वे च्या सर्व लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या