Breaking news

लोणावळा शहरात पर्यटक संख्या वाढल्याने वाहतूककोंडी

लोणावळा : लोणावळा शहरात आज रविवारच्या सुट्टी निमित्त मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गासह लायन्स पाॅईट परिसर, खंडाळा, कार्ला लेणी मार्ग, मळवली रोडवर वाहनांची कोंडी झाली आहे.

    मागील आठवड्यापासून लोणावळा परिसरातील गड किल्ले व लेण्या पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच लायन्स पाॅईटकडे जाणार्‍या मार्गावरील चेकपोस्ट नाका देखील बंद करण्यात आले आहेत. लोणावळ्यातील पर्यटन स्थळे याठिकाणी जाणारे मार्ग खुले करण्यात आल्याने पर्यटकांनी मोठ्या संख्येने लोणावळ्यात गर्दी केली आहे. तसेच पर्यटक संख्या वाढल्याने स्थानिक व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

इतर बातम्या