Breaking news

खंडाळा केळपेठ येथे दारासमोरून दुचाकी गाडीची चोरी

लोणावळा : खंडाळा केळपेठ येथे घराच्या दारासमोर उभी केलेली होंडा अँक्टीव्हा ही दुचाकी गाडी चोरी झाल्याची घटना रविवारी रात्री ते सोमवारी सकाळ दरम्यान घडली. याप्रकरणी सोमनाथ जाधव यांनी गाडी चोरीची तक्रार लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. MH 14 CT 7947 या क्रमांकाची सोलो रंगाची सदर अँक्टीव्हा गाडी आहे. रविवारी रात्री साडे अकरानंतर सदर वाहनाची चोरी झाली आहे. जाधव यांनी सर्वत्र गाडीचा शोध घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस वाहनाचा शोध घेत आहे.

इतर बातम्या