Breaking news

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर "द बर्निंग कार व बर्निंग ट्रक" चा थरार

आगीचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खोपोली (गुरुनाथ साठेलकर) : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबई लेनला 7 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास MH 48 A T 1366 या डस्टर मेक कार जळून खाक झाली. त्याचा धुर हवेत विरतो न विरतो तोच किलोमीटर 33.99 वर मुंबई लेनला सिमेंट वाहून नेणाऱ्या बल्करच्या उजव्या बाजूच्या मागील टायरनचे लायनर जॅम झाल्याने आग लागली. 

   या घटनेची खबर मिळताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस बोरघाट आणि डेल्टा फोर्सचे जवान तेथे दाखल झाले आणि तातडीने मदतकार्य सुरू केल्याने आग आटोक्यात आली.

आगीचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

   पहिली घटना किमी 34 येथे खालापुर टोलनाक्याजवळील फुडमाॅल जवळ रात्री बारा वाजता घडली. यामध्ये डस्टर गाडीला अचनाक आग लागली. दैव बलबत्तर म्हणून गाडीमधील चारही जण सुखरुप बाहेर पडले. कार चालकाने आग लागल्याचा अंदाज येताच, गाडी बाजुला करत थांबविल्याने सर्वजण गाडीतून बाहेर पडले व काही मिनिटातच गाडी जळून खाक झाली. 

 दुसरी घटना खालापूर टोल नाक्याजवळील पाली फाटा येथे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये देखील सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही घटनांमध्ये वाहने मात्र जळून खाक झाली आहेत.

 तीव्र उतारावर बहुतांशी वाहने इंधन वाचविण्यासाठी न्युट्रल पद्धतीने चालवली जातात किंवा गियर कंट्रोल करण्या ऐवजी वारंवार ब्रेक लावल्याने लायनर गरम होऊन जॅम होतात त्यामुळे टायर फिरणे बंद होऊन रस्त्या सोबत घर्षणाने हिट जनरेट होते आणि आग लागते. असाच काहीसा प्रकार सिमेंट बल्करच्या बाबतीत घडला असावा. मात्र लागलीच मदत पोचल्याने आणि देवदूत यंत्रणेच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझवल्याने मोठी हानी टळली. किर्र रात्री एक्सप्रेस वेवर या दोन्ही घटनांमुळे बर्निंग कार व बर्निंग ट्रकचा थरार सर्वांना पहायला मिळाला.

आगीचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इतर बातम्या