Breaking news

पवनानगर येथे नाकाबंदी दरम्यान अट्टल चोरटा चोरीच्या दुचाकीसह सापडला

लोणावळा : लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या आदेशानुसार संशयित वाहनांची तपासणी मोहिम गुरुवारी सायंकाळी सुरू असताना पवनानगर येथे एका चोरीच्या दुचाकीसह अट्टल चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्यावर यापुर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

    अंकूश रामभाऊ फाले (रा. चिखलगाव, ता. मुळशी, जिल्हा पुणे) असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

    लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक नितिन कदम, संतोष शेळके, पोलीस मित्र भिमा वाळुंज, श्रीकांत गर्दाळे हे पवनानगर येथे नाकाबंदी लावून संशयित वाहनांची तपासणी करत असताना चेकपोस्टवर एक संशयित स्प्लेंडर मोटार सायकल क्र. (MH 12 HK 5544) ही मिळून आली. दुचाकी चालकांकडे गाडीची कागदपत्रं मागितली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने, त्याच्याकडे निट चौकशी केली असता सदरची दुचाकी ही पिरंगुट, ता. मुळशी येथील लवळे फाटा येथून चोरली असल्याची कबुली त्याने दिली. त्याचा गुन्हे आलेख चेक केला असता, हिंजवडी व पौड पोलीस ठाण्यात त्याच्यावर यापुर्वी चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

इतर बातम्या