Breaking news

Lonavala : भांगरवाडी लोहगड दर्शन उद्यान चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार

लोणावळा : भांगरवाडी येथील मुख्य चौक असलेल्या लोहगड दर्शन उद्यान चौकातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी या विभागाचे नगरसेवक देविदास कडू यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच ही समस्या सुटणार आहे.

    देविदास कडू यांचा पाठपुरावा व नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांची सकारात्मकता यामुळे ही समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.

    सतत वाहनांची वर्दळ असलेल्या लोहगड उद्यान चौक परिसरात स्वा. सावरकरांचा पुतळा असून शेजारी श्रीराम मंदिर, गणपती व लक्ष्मी नारायण मंदिर तसेच व्यावसायिक अस्थापना, मेडिकल स्टोर, नगरपरिषद प्राथमिक शाळा असल्याने या चौकात सतत वाहतूककोंडी होत असते. या चौकाचे सुशोभिकरण करत उद्यानाचा निमुळता भाग कमी केल्याने याठिकाणी चौक मोठा होणार असून वाहतुकीसाठी जागा मोकळी होणार असल्याने या चौकातील समस्या सुटण्यास मदत होणार आहे. कडू यांनी याकरिता नगरपरिषदेमध्ये सातत्याने पाठपुरावा केला होता. मागील अनेक वर्षांपासून नागरिक येथील वाहतूककोंडीच्या समस्येने त्रासले होते.

इतर बातम्या