Breaking news

Maval News : सावधान; ह्या खड्डयाने आतापर्यत 39 अपघात घडविले आहेत

लोणावळा : कान्हे रेल्वे गेट समोर काही ऐतिहासिक खड्डे आहेत. पाणी सोडण्याचे वाॅल त्यामध्ये आहेत असे सांगितले जाते. त्या खड्डयांमध्ये आतापर्यत तब्बल 39 अपघात झाले आहेत. स्थानिकांना याबाबत वारंवार ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली मात्र प्रशासनाचे या मागणीकडे आक्षर्म्य दुर्लक्ष झाले आहे. आजून किती अपघात होण्याची वाट ग्रामपंचायत प्रशासन पाहणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. काम अगदी किरकोळ आहे मात्र ते करण्याची उदासिनता यामधून दिसत आहे. आंदर मावळातील 25 - 30 गावांचा हा रस्ता आहे. टाकवे एमआयडीसी मुळे कामगार व कंपनी वाहने तसेच मालवाहू वाहने यांची सतत याठिकाणी वर्दळ असते. कान्हे रेल्वे गेट जवळ पाण्याच्या वाॅलचे चेंबर आहेत. तेथे खड्डे तयार झाले आहेतम चेंबर उघडे असल्याने त्या अंदाज येन नाही व वाहने त्यामध्ये जाऊन अपघात होतात. पाणी सोडण्यासाठी वाॅल महत्वाचा असला तरी त्या खड्डयांवर लोखंडी फ्रेम करून झाकण बसविता येऊ शकते मात्र किरकोळ कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तो चेंबरचा खड्डा अपघातांना निमंत्रण ठरत आहे. मावळ माझा वाचकाने या खड्डयांचे फोटो व किती अपघात झाले आहेत, याची माहिती दिली आहे. पावसाळ्यात याठिकाणी आजुन अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांच्या या मागणीचा तात्काळ विचार करत सदर चेंबरला झाकण बसवावे तसेच अन्य खड्डे बुजवून घ्यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

इतर बातम्या