Breaking news

खुशखबर : लोणावळा व मावळ परिसरातील पर्यटनबंदी उठवली (आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याला यश)

लोणावळा : मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने लोणावळा व मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर घालण्यात आलेली पर्यटनबंदी आज जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी रद्द करत सर्व ठिकाणे पर्यटनासाठी खुली केली.

    कोरोना या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी 7 जुन रोजी लोणावळा व मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. राज्यात सध्या सर्वत्र अनलाॅकची प्रक्रिया सुरू असल्याने तसेच मावळ तालुक्यातील लहान मोठे व्यावसायीक यांच्या मागणीनुसार आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत सदरच आदेश रद्द करून घेतला आहे. यामुळे मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात पर्यटन व्यावसायावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायकांनी आनंद व्यक्त केला. सोबतच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवरील बंदी उठविण्यात आली आहे.

मावळ तालुका हा पर्यटनाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात असलेले गड किल्ले, लेण्या, धरणांचा परिसर तसेच डोंगर व पठारे ही पर्यटकांना कायम आकर्षित करत असतात. या सर्व ठिकाणी स्थानिक नागरिकांनी पर्यटनांवर आधारित लहान मोठे व्यावसाय सुरू केले आहेत. तसेच तालुक्यातील टुरिस्ट व रिक्षा व्यावसाय ह्या देखील पर्यटनावर अवलंबुन आहे. मागील सात महिन्यांपासून हे सर्व व्यावसाय बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. ग्रामीण भागातील व्यावसाय संघटना, पवना कृषी पर्यटन संघटना यांच्यासह अनेकांनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्याकडे पर्यटनबंदी आदेश उठविण्याची मागणी केली. यानुसार आज हा आदेश पारित करण्यात आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी शासकीय निर्देशांचे पालन करत व्यावसाय करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी मावळ माझा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा

इतर बातम्या