Breaking news

Lonavala News : देशी दारुची बेकायदा विक्री करणारा मुद्देमालासह शहर पोलिसांच्या सापळ्यात

लोणावळा : लोणावळा शहरात बेकायदेशीर रित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. शैलेश बसवराज मड्डे (वय 38 वर्ष, सध्या रा. सितारा गार्डन, राजमाची पाॅईंट, खंडाळा, मुळ रा. हिरेजिवरगी, गुलबर्गा, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.                  

     लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शैलेश मड्डे हा त्याच्या जवळील ऍक्टिव्हा दुचाकीमधून (क्रमांक MH 14 DW 2255) देशी दारूच्या 60 बाटल्या घेऊन विक्री साठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकातील पोलीस नाईक हनुमंत शिंदे, नितीन सूर्यवंशी, मनोज मोरे, स्वप्नील पाटील यांनी मड्डे याला ताब्यात घेत. त्यांच्याकडून एकूण 52,700/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात मुंबई प्रोबेशन अँक्ट क.65 (ई)(अ) नुसार कारवाई करण्यात आली आहे.

इतर बातम्या