Breaking news

लोणावळा शहरात मंगळवारी 24 तासात 81 मिमी पावसाची नोंद; वार्‍याचा जोर वाढला

लोणावळा : लोणावळा शहरात मंगळवारी 24 तासात 81 मिमी (3.19 इंच) पावसाची नोंद झाली आहे. शनिवार पासून लोणावळा शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारनंतर पावसाच्या सोबत जोरदार वारे वाहत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी. झाडांच्या खाली अथवा धोकादायक ठिकाणी जाऊ नये अथवा थांबू नये असे आवाहन लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

   लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत 1927 मिमी (75.78 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत चांगला पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत 1365 मिमी (53.74 इंच) पाऊस झाला होता. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर पडू नये.

इतर बातम्या